Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यारेशनचे धान्य काळ्या बाजारासाठी नेतांना पकडले

रेशनचे धान्य काळ्या बाजारासाठी नेतांना पकडले

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

तालुक्यातील गडगडसांगवी (Gadgadsangvi) येथे स्वस्त धान्य दुकानात (Cheap grocery store) वाटप करून शिल्लक राहिलेल्या धान्याचे ३२ कट्टे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांनाची कुणकुण ग्रामस्थांना लागताच त्यांनी सतर्कतेने मुद्देमाल ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वस्त धान्य दुकान नं १११ चे दुकानदार बाळासाहेब रामजी मते (Balasaheb Ramji Mate) यांनी अर्धवट धान्य वाटप करून उरलेल्या धान्याने भरलेले पोते रिकामे करून प्लास्टिक गोणीत भरले. त्यानंतर उरलेला माल वाटप न करता काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असतानाची कुणकुण ग्रामस्थांना लागताच त्यांनी ते पकडले.

यानंतर इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे (Tehsildar Parameshwar Kasule) यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेऊन पुरवठा विभागाचे पथक (Supply Department) घटनास्थळी पाठवुन कारवाई सुरु केली आहे. याबाबत तहसीलच्या अधिकाऱ्यांकडून व पुरवठा विभागाकडून पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची वाडीव-हे पोलिसांनी ( Wadivahre Police) गंभीर दखल घेतली असून मुरंबी (Murmbi) गडगडसांगवी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रतन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बेंडकुळी, माजी पोलीस पाटील दत्तु पुंजाजी शिंदे, दिलीप शिंदे, खंडू बेंडकोळी, समाधान भोई, बालाजी तळपाडे, काळु वाघ, हनुमंता वाघ, गजीराम बेंडकुळी, अशोक शेंडे, मंगलाबाई पाडेकरं, चंदाबाई बेंडकोळी, ठकुबाई पुरकुले, हिराबाई पाडेकर, सोन्याबाई पाडेकर,चंदाबाई मोर यांच्यासह आदी ग्रामस्थांनी ही मोहीम फत्ते करून मुद्देमाल हस्तगत केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या