Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानव्याची नवलाई; आठ दिवसात बहुचर्चित 'कॅथलॅब मशीन'चे तीन तेरा

नव्याची नवलाई; आठ दिवसात बहुचर्चित ‘कॅथलॅब मशीन’चे तीन तेरा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उत्तर महाराष्ट्रातून उपचारासाठी दाखल होणाऱ्या गरीब रुग्णांसाठी नाशिकचे संदर्भ रुग्णालय महत्वाचे ठरत असते. मात्र, येनकेन कारणाने हे रुग्णालय नेहमीच चर्चेत असते. मोठा गाजावाजा करत आठ दिवसांपूर्वी हृदयरोग रुग्णांसाठी संजीवनी असलेली कॅथलॅब मशीन (cath lab machine) बसविण्यात आले होती….

- Advertisement -

मात्र, आठ दिवसातच ती पुन्हा बंद पडली असून रुग्णांची गैरसोय झाली आहे. व्यवस्थापनाने मशीन सुरू असून फक्त यूपीएस बंद असल्याचे कारण देत केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नव्याची नवलाई संपली अशीच चर्चा संदर्भ मध्ये रंगत होती.

दरम्यान, मशीन बंद असल्याने ऍन्जिओग्राफी, एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रिया पुन्हा कोलमडली आहे. रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे. गरजू जनतेस सवलतीच्या किंबहुना मोफत गंभीर स्वरूपाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे उत्तर महाराष्ट्रासाठी शासकीय मल्टी स्पेशालिस्ट संदर्भ सेवा रुग्णालय शालिमार परिसरात उभारले आहे….

रुग्णालय झाल्यापासून येथील मशिनरी नादुरुस्त समस्येस घेऊन नेहमी वादात राहिले आहे. दोन महिन्यांपासून कॅथलॅब मशिन नादुरुस्त झाल्याने बंद होते. एक सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन काही दिवसांपूर्वी ते सुरू करण्यात आले मात्र आठच दिवसात ते बंद पडल्याने लगेच रुग्णांना विनाउपचार माघारी परतण्याची वेळ आली.

यंदा मात्र मशिन बंद होण्यामागे वीजपुरवठा करणारे यूपीएस यंत्र नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे कॅथलॅब मशिनचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. अन्य यंत्रणेवर मशिन चालवणे शक्य नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया दरम्यान मशिन निकामी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी यूपीएस यंत्रच आवश्यक आहे.

दोन महिने कॅथलॅब मशिन बंद असल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत होता. आता यूपीएस यंत्रणा बंद झाल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. यूपीएसची आवश्यकता लक्षात घेता, नवीन यूपीएस बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चेनई येथील कंपनीकडून यूपीएस मागविण्यात आले आहे. सुमारे आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या