नाशिक विभागातील 'इतक्या' जातीवाचक वस्त्यांची नावे हद्दपार

तृतीयपंथीयांना मानधनाचा विचार; विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे
नाशिक विभागातील 'इतक्या'  जातीवाचक वस्त्यांची नावे हद्दपार
Radhakrushna Game

नाशिक | Nashik

राज्यभरातील रस्ते, वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समाज कल्याण विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात(nashik division) तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली असून आज अखेर १६५९ जातीवाचक रस्ते, वाडया, वस्त्यांची नावे बदलण्यात आले आहे. तसेच पुणे महापालिकेच्या धर्तीवर तृतीय पंथीयांना मानधन देण्याचा विचार करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले....(review meeting radhakrishna game nashik divisional commissioner)

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय दक्षता व नियंत्रण समिती, तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या समिती यांचा आढावा घेण्यात आला. (Review meeting on cast wise names to some nagars)

त्यावेळी विभागीय आयुक्त गमे बोलत होते. यावेळी विशेष पोलिस महानिरिक्षक,डॉ.बी. जी. शेखर पाटील(nashik division ig dr b g shekhar patil), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,(zp vel leena bansod) पोलीस अधीक्षक सचिन पाटील(sp sachin patil), जिल्हा सरकारी अभियोक्ता राजाराम बेंडकोळी ,समाजकल्याण विभागाचे उपायुक्त डॉ भगावान वीर,पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, उपायुक्त रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे उपस्थित होते. दुरदृष्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासह सर्व यंत्रणाचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, विभागातील शहरी क्षेत्रातील १९० नावे बदलण्यात आली आहेत तर ग्रामीण भागातील १४५९ जातीवाचक नावे बदलण्यात आली आहेत. विभागातील शहरी भागात महानगरपालिकांच्या माध्यमातून लवकरात लवकर ही नावे बदलण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी विभागीय आयुक्त गमे यांनी सर्व संबंधित यत्रणांना दिले. तृतीयपंथी कल्याण व त्यांच्या हक्काचे संरक्षण कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले, या कल्याण मंडळाचा देखील आढावा आज रोजी घेण्यात आला.

तृतीयपंथी व्यक्तीच्या कल्याणासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने कार्यवाही करावी. तसेच पुणे महानगरपालिका प्रशासनाने रुपये ३ हजार मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धर्तीवर विभागातील प्महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करून विचार करण्यात येईल, असेही गमे यानी यावेळी सांगितले.

विभागीय आयुक्त गमे यांनी यावेळी विभागीय समितीच्या सदस्य शमिना पाटील (जळगाव) यांनी तृतीयपंथीयाना येणा-या अडचणी व सामाजिक प्रश्नाबाबत उपस्थिताना माहिती करुन दिली.

नाशिक विभागात एकूण ६०३ तृतीयपंथीयांची संख्या असून त्यापैकी ३६३ तृतीयपंथीयांना कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती समाज कल्याण विभागात प्राप्त झाली आहे, त्याचप्रमाणे विभागात १२९ जणांना ओळखपत्र व ओळखपत्र प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे उपायुक्त भगवान वीर यांनी दिली.

Related Stories

No stories found.