…म्हणून एकाच दिवशी सहा नगरसेवकांवर गुन्हे

…म्हणून एकाच दिवशी सहा नगरसेवकांवर गुन्हे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनातर्फे (Maharashtra Government) घोषित केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन घटनांमध्ये ६ नगरसेवकांवर (Corporators) गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहे...

पहिल्या घटनेत प्रभाग क्रमांक २८ मध्ये पाण्याच्या टाकीच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने १०० ते १५० नागरिकांना एकत्र करत करोनाबाबत असलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केले.

यामुळे अंबड पोलिसात (Ambad Police) नगरसेवक दीपक दातीर (Dilip Datir), डी. जी. सूर्यवंशी (D. G. Suryawanshi), सुवर्णा मटाले (Suvarna Matale), प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत, प्रभाग २६ मध्ये विविध विकासकामांच्या उदघाटनानिमित्त करोना विषाणू प्रतिबंधाबाबत असलेले नियमांचे उल्लंघन करत २० ते २५ नागरिकांची गर्दी जमविली.

यामुळे नगरसेवक भागवत आरोटे (Bhagwat Arote) आणि मधुकर जाधव (Madhukar Jadhav) यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक पवार अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.