Monday, April 29, 2024
HomeनाशिकNashik News : चांदवड टोलनाक्यावर कर्मचाऱ्याकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; गुन्हा दाखल

Nashik News : चांदवड टोलनाक्यावर कर्मचाऱ्याकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; गुन्हा दाखल

चांदवड | प्रतिनिधी | Chandwad

देशभरात काल स्वातंत्र्यदिन (independence day) उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, नाशिक जिल्ह्यातील चांदवड (Chandwad) येथील मंगरूळ टोलनाक्यावरील (Mangrool toll plaza) एका कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) संशयितास (Suspect) ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे…

- Advertisement -

Nashik News : समृद्धीवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी

शहादाब कुरेशी असे संशयिताचे नाव असून तो चांदवड येथील टोल नाक्यावर गेल्या पाच ते सहा वर्षांपासून टी.सी. या पदावर कार्यरत आहे. काल मंगळवार (दि.१५) रोजी त्याने काही नागरिक व टोल कर्मचाऱ्यांसमोर पाकिस्तान (Pakistan) जिंदाबादच्या घोषणा दिल्या. तर टोलनाका व्यवस्थापकाने सदर कर्मचाऱ्यास निलंबित देखील केले आहे.

Nashik News : पाण्यात बुडून आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

यानंतर चांदवड पोलिसांनी तात्काळ टोल नाक्यावर दाखल होत त्यास ताब्यात घेऊन पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याबद्दल त्याच्याविरुद्ध भारतीय संविधान कलम (Indian Constitution Act) १५३ अन्वये व १५३ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांकडून त्याची धार्मिकतेत तेढ निर्माण करणे, देशाबद्दल प्रेम नसणे व दुसऱ्या देशाचा आदर करणे याबाबत अधिक चौकशी केली जात असून यामागचे खरे कारण काय? याचा तपास करण्यात येत आहे.

Raj Thackeray : “…म्हणून सगळेजण टुणकन तिकडे गेले”; अजित पवारांची नक्कल करत राज ठाकरेंचा हल्लाबोल

दरम्यान, याप्रकरणाची नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) यांनी स्वतः लक्ष घालून गंभीर दखल घेतली असून तपासाला गती दिली आहे. तर पुढील तपास चांदवडच्या प्रभारी पोलिस निरीक्षक सविता गर्जे व पोलीस अंमलदार धुमाळ हे करत असून संशयितावर काय कार्यवाही केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Raj Thackeray : “चांद्रयान चंद्रावर पाठवून काय उपयोग, तिथे जाऊन…”; मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्र

- Advertisment -

ताज्या बातम्या