खासदार संजय राऊतांविरोधात नाशकात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

खासदार संजय राऊतांविरोधात नाशकात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

नाशिक | Nashik

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये (Nashik) आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेत राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निकालावर भाष्य केले होते. त्यानंतर आता राऊतांना हे वक्तव्य चांगलेच भोवले आहे...

खासदार संजय राऊतांविरोधात नाशकात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
Karnataka Election : बंगळुरूत मध्यरात्री हाय होल्टेज ड्रामा; काँग्रेसने जिंकलेली जागा गमावली, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय राऊतांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत "राज्यातील सरकार हे अपात्र आमदारांच्या (Disqualified MLA) भरवशावर असल्याने ते बेकायदेशीर असून सर्वोच्च न्यायालयाने देखील ते बेकायदेशीर ठरवले आहेत. त्यामुळे अशा घटनाबाह्य आणि बेकादेशीर सरकारच्या आदेशांचे पालन करू नये" असे आवाहन राऊतांनी सरकारी यंत्रणांना केले होते.

खासदार संजय राऊतांविरोधात नाशकात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
Weather Updates : देशातील 'या' राज्यांमध्ये उष्णतेची लाट

दरम्यान, त्यानंतर आता या वक्तव्याप्रकरणी खासदार राऊत यांच्याविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) भादंवि ५०५ (१ ) (ब)  कलमाअंतर्गत पोलीस प्रती अप्रतिची भावना निर्माण करणे, चिथावणी देणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com