माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींवर गुन्हा दाखल; 'हे' आहे कारण

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींवर गुन्हा दाखल; 'हे' आहे कारण

मुंबई | Mumbai

भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Cricketer Vinod Kambli) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) पत्नीने तक्रार दाखल केली असून मद्यधुंद अवस्थेत विनोद कांबळी यांनी अत्याचार आणि मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे.

दाखल केलेल्या तक्रारीनुसार वांद्रे पोलिसांनी कांबळी यांच्याविरोधात भारतीय दंडविधानातील ३२४, ५०४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल (Filed a case) केला आहे. विनोद कांबळी यांनी कुकिंग पॅन (स्वयंपाकासाठीचे एक भांडे) फेकून मारल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने (Wife) केला आहे.

दरम्यान, या घटनेत अँड्रिया यांच्या डोक्याला जखम झाली असून दारुच्या नशेत कांबळी यांनी हे कृत्य केल्याचा दावा केला जात आहे. तसेच याप्रकरणी वांद्रे पोलिस (Police) अधिक तपास करत असून हे प्रकरण मिटल्याचे कांबळी यांच्या पत्नीने सांगितले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com