
मुंबई | Mumbai
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिका नेहमीच चर्चेत असते. ही मालिका आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumar Modi) आणि ऑपरेशन हेड सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
पोलिसांनी (Police) मालिकेतील अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन ही कारवाई केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर शोचे निर्माते असित मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, “एफआयआर नोंदवण्यात आली आहे की नाही याची आम्हाला माहिती नाही. सध्या पोलीसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यामुळे ते यावर जास्त भाष्य करू शकत नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणावर बोलणे टाळले आहे.
मालिकेचे निर्माते असित मोदी, सोहेल रमाणी आणि जतीन बजाज छळ करत असल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ३५४ आणि ५०९ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.