गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | Nashik

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल करण्यात आला होता. गौतमी पाटील एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना चोरून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आणि तो व्हायरल करण्यात आला होता….

याप्रकरणी पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti University Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्र राज्य महिला (Women’s Commissions) आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर चांगल्याच (Rupali Chakankar) संतापल्या असून त्यांनी याविषयी कठोर भूमिका घेतली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

महिलांबाबतचे सायबर गुन्हे (Cyber ​​crime) रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे एका पत्राद्वारे सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक (Inspector General of Police) यांना सूचित केले आहे. यानुसार पुणे पोलिसांनी याप्रकरणी गंभीर दाखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

मनीष सिसोदियांच्या अटकेविरोधात मुंबईत AAP आक्रमक

महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे (Special Squad) शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

…अन् आमदार सरोज अहिरेंना अश्रू अनावर; नेमकं काय घडलं?

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *