बैलगाडा शर्यत अंगलट; शिवसेनेच्या माजी आमदाराला कोणत्याही क्षणी अटक

पोलीस निरीक्षक रहाटे यांची माहिती
बैलगाडा शर्यत अंगलट; शिवसेनेच्या माजी आमदाराला कोणत्याही क्षणी अटक
File Photo

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरालगतच्या ओझरमध्ये काल (दि. २५) बैलगाडा शर्यत (bullock car race) आयोजित करण्यात आली होती. मात्र परवानगी न घेताच ही बैलगाडा शर्यती आयोजित केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाईचे आदेश दिले होते...

या प्रकरणी शर्यतीसाठी न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध मोडल्याने शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांच्यासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे ओझर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रहाटे यांनी सांगितले.

File Photo
कारवाईच्या भीतीने आयोजकांची धांदल; बैलगाडा शर्यत थांबवली

पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने शर्यतीवरील बंदी उठवली असून राज्य शासनाचा तसा शासन निर्णय देखील आहे. मात्र, त्याच्या काही अटी शर्ती आहेत. शर्यतीच्या 15 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असते.

ओझर येथील बैलगाडा शर्यतीची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. राज्यात करोना तसेच त्याचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शासनाने नेमून दिलेले नियम या शर्यतीत डावलण्यात आले.

तसेच साथ रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन, प्राण्यांची काळजी घेतली नाही, प्राण्यांना नीट चारा पाणी केला नाही, प्राण्यांना निर्दयपणे वागवले म्हणून माजी आमदारासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

File Photo
नाशिकमधील 'त्या' बैलगाडा शर्यतीला परवानगी नव्हती; कारवाई होणार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील ही पहिलीच बैलगाडा शर्यत होती. मात्र विनापरवानगी या शर्यतीचे आयोजन केल्याने नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी शर्यतीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

File Photo
Video : नाशिकमध्ये आज रंगतेय बैलगाडा शर्यत; संपूर्ण राज्याचे लक्ष

दरम्यान, स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली असून यासाठी पूर्वपरवानगीची गरज असते.

यानंतर वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमांतून याठिकाणी पाहणी केली जाते. त्यांनतर ही शर्यत घ्यायची की नाही यावर पोलीस आणि प्रशासन परवानगी देत असतात. मात्र, ओझर येथे होत असलेल्या स्पर्धेची परवानगी न घेतल्याने कारवाई करणे क्रमप्राप्त असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com