Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशNEET-JEE परीक्षेला हिरवी झेेंडी

NEET-JEE परीक्षेला हिरवी झेेंडी

नवी दिल्ली/ New Delhi

नीट आणि जेईई NEET-JEE परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court फेटाळली. परीक्षेचे आयोजन करण्यास न्यायालयाने संमती दिली. मुलांचे एक वर्ष वाया जाऊ देणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आता NEET-JEE Mainsपरीक्षा वेळेतच होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने स्पष्ट झाले. NEET-JEE परीक्षा सप्टेंबर महिन्यात करण्याचे नियोजन आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

- Advertisement -

न्यायालयाने याचिका फेटाळताना परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर आपण संकटात टाकत आहोत. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यांनी परीक्षा घेताना संपूर्ण काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले असल्याची नोंद घेतली. धोरणात्मक निर्णयात आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही असेही न्यायालयाने सांगितले.

JEE परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे. NEET ची परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. या परीक्षा स्थगित करण्याच्या मागणीसाठी ११ राज्यातील ११ विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या