Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकारच्या अपघातात तीन जण ठार

कारच्या अपघातात तीन जण ठार

येवला

येवला तालुक्यातील सावरगावजवळ कारला झालेल्या भीषण अपघातात धामोडे येथील दोन जण व पिंपळगाव लासलगाव येथील एक जण असे तीन जण ठार झाले.

- Advertisement -

दि. ७ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सावरगाव येथील पुलाजवळ असलेल्या गतिरोधक येथे स्विफ्ट कारचा वेग कमी होताच पाठीमागून आलेल्या एका अज्ञात वाहनाने स्विफ्ट कार क्रमांक एम एच ,१५ एफएफ ४७२४ ही येवलेच्या दिशेने येत असताना अज्ञात वाहनाने स्विफ्ट कारला पाठीमागून जबर धडक दिली.

स्विफ्टमध्ये पाठीमागे बसलेले ऋषिकेश अशोक भड व वय २३ आणि सजन संजय भड व २१ दोघेही राहणार धामोडे तालुका येवला व भड कुटुंबीयांचे जावई पिंपळगाव लासलगाव येथील राजेंद्र ठोंबरे वय ३५ हे तिघेही जागीच ठार झाले.

स्विफ्ट कारला पाठीमागून जबर धडक बसल्याने पाठीमागे बसलेले या तिघांचा गाडीच्या पत्र्यात अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताचा आवाज इतका भीषण होता की, एक किलोमीटरपर्यंत या धडकेचा अपघाताचा आवाज गेला.

परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या सहकार्याने त्यांना गाडीतून बाहेर काढले. स्विफ्ट कार मध्ये पुढे बसलेले दोघे अजय शंकर भड व गणेश विजय भड हे दोघे जण किरकोळ जखमी झाले. त्यांना वैद्यकीय उपचार करून घरी पाठवण्यात आले. याबाबतची नोंद येवला तालुका पोलिसात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उजवलसिंह राजपूत करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या