शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

मुंबई | Mumbai

शिंदे गटाचे (बाळासाहेबांची शिवसेना) आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या (Police) गाडीचा अपघात (accident) झाल्याची घटना समोर आली आहे.

मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासाठी आमदार शहाजीबापू पाटील हे त्यांच्या मतदारसंघातील नाझरा येथे गेले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू
गांधींचा फोन अन् बाळासाहेबांचा अर्ज मागे; काय आहे प्रकरण?

शिबिर आटोपल्यानंतर ते सांगोला (sangola) शहराकडे येत असताना त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलीस गाडीचा ताफा होता. त्यातील एका गाडीचा आणि मोटार सायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com