चीनची शिरजोरी : आम्ही एक इंचही जमीन सोडणार नाही

jalgaon-digital
1 Min Read

बीजिंग

भारत व चीनमधील सीमा प्रश्नावर (LAC Dispute) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व चीनीचे संरक्षण मंत्री वेई फेंगही यांच्यात रूसमध्ये शुक्रवार दोन तास बैठक झाली.

बैठकीनंतर चीनकडून वक्तव्य जारी करण्यात आले. त्यानुसार वेंग फेंगही यांनी म्हटले की, सीमा प्रश्नामुळे भारत-चीनच्या संबंधात मोठा तणाव निर्माण झाला आहे. यामुळे दोन्ही देशांच्या लष्करप्रमुखांनी समोरासमोर बसून चर्चा करणे गरजेचे आहे.

चीनने पुन्हा एकदा सीमा प्रश्नाचा दोष भारतावर ढकलला आहे. दोन्ही देशातील सीमा प्रश्नास भारतच जबाबदार असल्याचा आरोप करत चीनीचे संरक्षण मंत्री फेंगही यांनी म्हटले की, चीन आपली एक इंचही जमीन सोडू शकत नाही. चीनचे लष्कर आपल्या देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यास समर्थ आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *