Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशेतात छापा टाकून गांजा जप्त

शेतात छापा टाकून गांजा जप्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik

चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथे शेतामध्ये तुरीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

- Advertisement -

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेतात छापा टाकून ५० हजाराचा गांजा जप्त केला आहे.

तर झाडे लावणार्‍या शेतकर्‍यास अटक करण्यात आली आहे. दत्तू यादव चौधरी (वय ४५, रा.कांनमंडाळे, ता. चांदवड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांना आदेश दिले आहेत.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी रविवारी पिंपळगाव बसवंत, वडनेर भैरव, चांदवड परिसरात अवैध धंद्यांची माहिती मिळवली. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना शिरवाडे फाटा येथे त्यांना गुप्त बातमीदाराकडून कांनमडाळी शिवारात दत्तू यादव चौधरी याने स्वमालकीच्या शेतात गांजा झाडाची लागवड केल्याची माहिती दिली.

त्यानुसार पोलिसांनी खात्री करण्यासाठी पाहणी केली असता शेतामधील तूर पिकाच्या आतमध्ये व इतर ठिकाणी गांजाच्या २३० झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत ९ किलो ३९० ग्रॅम वजनाचा सुमारे ४६ हजार ५०० रुपयांच्या गांजाची ओली झाडे जप्त केली. याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या