Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशमहत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी

महत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी

कॅनेडा

कोरोनावर एकच उपाय आहे, तो म्हणजे लसीकरण. यामुळेच सर्वच देशांनी लसीकरणाला वेग दिला आहे. लसीकरण मोठ्यांसाठी असले तरी मुलांसाठी असलेल्या फायजरच्या (Pfizer-BioNTecch)लसीला मंजुरी दिली. विशेष म्हणजे फायजरने भारतातही मंजुरीसाठी परवानगी मागितली आहे. ही लस 100% परिणामकारक सिद्ध झाली आहे.

- Advertisement -

maratha reservation मराठा समाज पुन्हा मोर्चे काढणार : पहिला मोर्चा या शहरात

जगभरात लसीकरण सुरू झाले असले तरी लहान मुलांचे लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही. अमेरिकेतही फायजर-बायोएनटेकच्या लसीला 12 ते 15 वर्षांच्या मुलांना देण्याची परवानगी कॅनडाने दिली आहे. यामुळे लवकरच लहान मुलांनाही लस मिळू शकते. कॅनडाच्या ड्रग रेगुलेटर हेल्थ ही मंजुरी दिली आहे. यापूर्वी ही लस 16 पेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना दिली जात होती. आता अमेरिकेतही फायजरच्या लसीला लहान मुलांवर वापरासाठी मंजुरी मिळू शकते.

मुलांसाठी या कंपन्यांच्या लसी

जानेवारी ते मार्चदरम्यान फायजरच्या लसीकरणाच्या चाचण्या मुलांवर झाल्या आहेत. तेव्हा ही व्हॅक्सीन मुलांसाठी सुरक्षित असल्याचे कंपनीने सांगितले होते.अमेरिकेत फायजरशिवाय मॉडर्ना आणि जॉनसन अँड जॉनसनच्या लसीचे मुलांवर ट्रायल्स केले जात आहेत. मॉडर्नाच्या लसीचे परिणाम जूनमध्ये येतील. तर, जॉनसन अँड जॉनसनच्या व्हॅक्सीनचे परिणा त्यानंतर येतील. म्हणजेच, या वर्षाच्या अखेरपर्यंत दोन्ही व्हॅक्सीन मुलांसाठी तयार होतील.

फायजरने 12-15 वर्षांच्या 2,260 मुलांवर लसीचे परीक्षण केले. 31 मार्च 2021 च्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ही लस या वयोगटातील मुलांवर 100% इफेक्टिव आहे. ट्रायल्समध्ये 18 मुलांना कोरोनाची लागण झाली होती. पण हे सर्व प्लेसिबो ग्रुपचे होते. आता या मुलांवर पुढील दोन वर्षे लक्ष्य ठेवले जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या