त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

एसटीचे विलिनीकरण नाहीच
त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण (Merger of ST into State Government )करण्याच्या संदर्भात त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.यासंदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी भूमिका जाहीर करण्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab )यांनी केली होती.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. कर्मचार्‍यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्या तरी विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी कायम आहेत. या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई सुरू होती.

याबाबत त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने विलीनीकरण शक्य नसल्याची शिफारस सरकारला केली होती. हा अहवाल काल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com