राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय; दोन जिल्ह्यांच्या नामांतराला मंजुरी

राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय; दोन जिल्ह्यांच्या नामांतराला मंजुरी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष सुरु असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेत निर्णयांचा धडाका लावला आहे.

काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai International Airport) नाव बदलून ते दि. बा. पाटील.आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले होते. त्यानंतर आज ठाकरे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद(Aurangabad) शहराचे नामांतर 'संभाजीनगर' (Sambhajinagar) तर तसेच उस्मानाबाद (Osmanabad) शहराचे नामांतर 'धाराशिव' (Dharashiv) असे नामांतर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत खंत व्यक्त केली आहे. मला माझ्याच लोकांनी दगा दिल्याने ही परिस्थिती उदभवली आहे. तसेच मला चांगले सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com