
मुंबई । वृत्तसंस्था Mumbai
मुंख्य्मंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadanavis ) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) पाच ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भाजपचे 8 तर शिंदे गटामधील सात जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. राजभवनामध्ये या अनुशंगाने तयारी सुरु करण्यात आली आहे. भाजपकडे स्वतःचे आणि अपक्ष असे 115 आमदार आहेत. शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत. शिंदेंसोबत आलेल्या मोठ्या नेत्यांना मंत्री करावेच लागेल. त्याचप्रमाणे
मंत्रिमंडळ विस्तार करताना एकनाथ शिंदेंना प्रादेशिक समतोल बघावा लागेल. शिंदे-फडणवीस सरकारच्मा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सुत्रांनी दिलेल्मा माहितीनुसार, शुक्रवारी संध्माकाळी राजभवानावर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहा तारखेला राज्यपालांचा नियोजित दिल्ली दौरा आहे. तर सात तारखेला निती आयोगाची बैठक आहे, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जायचे आहे. त्यामुळे त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावतीनेही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संकेत देण्यात आले आहेत.