SSC Exams राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द :पाहा, शिक्षणमंत्री यांनी काय सांगितले

video : पाहा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काय सांगितले
SSC Exams राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द :पाहा, शिक्षणमंत्री यांनी काय सांगितले

सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. राज्यात करोनाची गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहाता आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दहावीच्या परीक्षा रद्द (Maharashtra SSC exam cancelled) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली. यावर्षी परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावे यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमताने निर्णय झाला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

दहावीच्या शाळा यंदा ऑनलाईन पद्धतीने झाल्या त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, या संदर्भात काही असेसमेंट घ्यायच्या असतील तर त्यासंदर्भातला निर्णय घेण्यात येईल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com