MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय
MPSC

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC ) च्या परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने (cabinet meeting)घेतला आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

MPSC
माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. विविध संवर्गाच्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली नव्हती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. यामुळे कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी (MPSC )परीक्षा देता आल्या नाही त्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आज याला मान्यता देण्यात आली आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी देखील मुदत वाढ देण्याची विद्यार्थ्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com