ByPoll Results Live : मध्य प्रदेश, गुजरातमध्ये भाजपच !

ByPoll Results Live : मध्य प्रदेश, गुजरातमध्ये भाजपच !

गुजरात | Gujrat

देशातील ११ राज्यांमधील ५८ विधानसभा जागा आणि बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी ३ आणि ७ नोव्हेंबर रोजी पोट निवडणूका घेण्यात आल्या होत्या.

आज बिहार विधानसभा निवडणुकांसोबतच या पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर करण्यात येत आहे. गुजरात विधानसभा पोटनिवडणूकीत सर्व आठ जागांवर भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे.

दरम्यान मध्य प्रदेशमधील १९ जिल्ह्यातील २८ विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या मतमोजणीचे निकाल हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. अंतिम निकाल येणे अद्याप बाकी आहे. परंतू, चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. २१ जागांवर भाजप आघाडीवर आहे. ६ ठिकाणी काँग्रेस, तर एका ठिकाणी बसप आघाडीवर आहे. जवळपास सर्व चित्र स्पष्ट झाल्यानंतर कमलनाथ यांनी काँग्रेस कार्यालय सोडले. प्रसारमाध्यमांनी त्यांच्यी सवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

मध्यप्रदेश पोटनिवडणुकीत मिळत असलेल्या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीमध्ये मोठा उत्साह आहे. भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा करताना दिसत आहेत.

मतदारांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य असेल - माजी मुख्यमंत्री कमलनाथ

लोकशाहीमध्ये मतदार जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. जनतेने दिलेला निकाल आम्ही स्विकारू, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com