Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासन 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था बनणार सर्वात मोठी

सन 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था बनणार सर्वात मोठी

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

भारतीय अर्थव्यवस्था ही सन 2025 पर्यंत जगातील पाचवी तर सन 2030 मध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असे भाकीत सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च (सीईबीआर) या संस्थेनें वर्तवले आहे.

- Advertisement -

या संस्थेच्या एका अहवालात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. भारत सन 2019 मध्ये ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनला होता. मात्र, सन 2020 मध्ये भारत पुन्हा सहाव्या स्थानावर फेकला गेला.

सीईबीआरच्या अहवालात म्हटलें की, करोना महामारी आणि रुपयाची डळमळीत स्थिती यामुळे भारत सहाव्या स्थानी ढकलला गेला. या वर्षी ब्रिटनने भारताला मागे टाकले होते. पण भारत 2025 मध्ये पुन्हा ब्रिटनच्या पुढे निघून जाईल.

भारतीय अर्थव्यवस्था 2021 मध्ये 9 टक्के आणि 2022 मध्ये 7 टक्क्यांनी वाढेल असेही सीईबीआरने म्हटले आहे. आर्थिक स्वरुपात भरभराट झाल्मानंतर स्वाभाविकपणे भारताचा वेग कमी होईल आणि सन 2035 मध्मे जीडीपीची वाढ 5.8 टक्के राहिल. मादरम्मान भारत सन 2030 मध्मे जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्मवस्था बनेल. तसेच भारत 2025 मध्मे ब्रिटन, 2027 मध्मे जर्मनी आणि 2030 मध्मे जपानला मागे टाकेल, असेही मा अहवालात म्हटले आहे.

चीन असेल अव्वलस्थानी

सीईबीआरच्या अहवालानुसार, चीन 2028 मध्ये अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. सुरुवातीला असे सांगितलें जात होते की चीन 2033 पर्यंत या स्थानावर पोहोचेल. मात्र, कोविड-19 महामारीने परिस्थिती बदलून टाकली. चीन वेगाने या संकटातून बाहेर पडला आहे. तर अमेरिकेचा अजूनही संघर्ष सुरुच आहे. याच कारणामुळे चीन पाच वर्षांमध्येच अमेरिकेपेक्षा पुढे निघून जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या