Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात पावसाचा कहर; गाडगे महाराज पुलाखाली अडकली बस

नाशकात पावसाचा कहर; गाडगे महाराज पुलाखाली अडकली बस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात आज सायंकाळी जोरदार पाऊस बरसला. साडे पाच वाजे पासून साडे आठ वाजे पर्यंत ह्या तीन तासांत ७६.८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहे.

- Advertisement -

गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पावसाच्या पाण्याने आणि धरणातील विसर्गामुळे गोदावरीच्या नदीपात्रात वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आता गाडगे महाराज पुलाखाली एक व्होल्वो ही बस पुराच्या पाण्यात अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, गोदाकाठावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून अग्निशमन वाहने तसेच रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या