Video : बसचा संप सुरू; प्रवाशांचे हाल

Video : बसचा संप सुरू; प्रवाशांचे हाल
Breaking News

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporation) सेवकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये (nashik) रविवारी (दि.७) सायंकाळी अचानक बंद पुकारल्यामुळे सर्वच बसस्थानकावर (bus station) बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

जिल्ह्यातील सर्वच आगारांच्या सेवकांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. फाईन दिवाळीच्या (diwali) सणात राज्य परिवहन महामंडळाच्या सेवकांनी घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.

रविवारी सायंकाळी अचानकपणे बंद पुकारला गेल्यामुळे प्रवाशांना बाहेर गावी जाणे मुश्कील होऊन बसले आहे. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक महामार्ग ठक्कर बाजार (Thakkar Bazaar) या बसस्थानकावर आल्यावर बसचा संप असल्याचे अचानक समजल्यानंतर प्रवाशांना पुढील प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये महिला बालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

बाहेरगावाहून ज्या बसेस बसस्थानकामध्ये आल्या. त्याच बसेस बाहेरगावी सोडल्या जात असल्यामुळे काही प्रमाणात का होईना प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, सायंकाळनंतर बस आगारातून वा बसस्थानकामधून बाहेर गावी जाणाऱ्या बसेस सोडल्या जात नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com