चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात; ७ ते ८ प्रवासी जखमी

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात; ७ ते ८ प्रवासी जखमी

बुलढाणा | Buldhana

बुलढाण्यात (Buldhana) जुन्या मुंबई-पुणे-नागपूर महामार्गावर सुलतानपूर (Mumbai Pune Nagpur Highway) नजिक खाजगी बसला अपघात झाला. बस चालकाला झोप आल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी होऊन अपघात (Bus Accident) झाला. जखमींपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जुन्या मुंबई पुणे नागपूर महामार्गावर सुलतानपूर नजिक खाजगी बसला भीषण अपघात झाला. बस चालकाला झोप आल्याने भरधाव बस वरील नियंत्रण सुटून बस पलटी झाली. या अपघातात बसमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत

सविस्तर वृत्त असे की, साई अमृत ट्रॅव्हल्सची बस पुण्याहून नागपूरकडे जात होती. बसमध्ये 35 प्रवासी होते. अनियंत्रित होऊन बस सुरुवातीला झाडाला धडकली आणि नंतर पलटी झाली. पोलीस आणि स्थानिकांनी जखमी प्रवाशांना मदत केली. जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी औरंगाबाद इथे नेण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com