...अन् ५० प्रवाशांची बस शिरली थेट गोदापात्रात

...अन् ५० प्रवाशांची बस शिरली थेट गोदापात्रात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या दोन दिवसांपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे....

होळकर पुलाखालून ४ हजार ८३३ क्युसेस विसर्ग होत असल्याने गोदाघाट परिसरात पूरस्थिती झाली आहे. आज दुपारी गाडगे महाराज पुलाजवळ एक प्रवासी बस थेट गोदापात्रात शिरल्याची घटना घडली आहे.

चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही बस बाहेरील राज्यातील असून या सुमारे ५० ते ५५ पर्यटक होते. बस गोदापात्रात शिरल्याने ही बस पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली.

क्रेनच्या सहाय्याने बस पाण्याच्या बाहेर काढण्यात आली आहे. सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com