बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

दहिवड | वार्ताहर

मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील देवळा तालुक्यातील सांगवी फाट्याजवळ आज रविवार दिनांक 30 जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मालेगाव कडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या बसने पुढे चालणाऱ्या दुचाकी स्वारास धडक दिल्याने अपघात होऊन दुचाकी स्वार जखमी झाला आहे.

सदर अपघातात बस क्रमांक एमएच -20 -सीजी -27 70 ही मालेगाव नाशिकच्या दिशेने जात होती तर उमराणे शिवारात राहणारा दुचाकी स्वार हा दुजाकी क्रमांक एम एच 41 बिके 22 33 वरून पुढे जात होता. सांगवी फाट्याजवळ असलेल्या स्पीड डिव्हायडर वर ओव्हरटेक च्या प्रयत्नात बसने दुचाकी स्वाराला जबरदस्त धडक दिली त्यात दुचाकीस्वार जखमी झाला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

या घटनेची माहिती सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कळतात सोमा कंपनीचे कर्मचारी संदीप तायडे, विनायक गांगुर्डे, प्रकाश मदने, शेख, कैलास आहेर, सुखदेव आहेर, राजू सूर्यवंशी आदी कर्मचारी घटनास्थळी हजर झाले व त्यांनी सदर तरुणाला उपचारासाठी उमराणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com