
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे (Nationalist leader MLA Eknathrao Khadse) यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत (death of the child) भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (BJP leader and Rural Development Minister Girish Mahajan ) यांनी बेताल वक्तव्य (incoherent statement) केल्याचा आरोप करीत मंगळवारी दुपारी राष्ट्रवादीच्या (Nationalist officials) संतप्त पदाधिकार्यांनी आकाशवाणी चौकात महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे (symbolic effigy burning) दहन करीत निषेधाच्या घोषणा दिल्यात.
जळगावात पत्रकारांशी बोलतांना मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या मुलाची आत्महत्या झाली की खून याचा तपास करण्याची गरज असल्याचे विधान केले होते. यावरुन जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
मंगळवारी सकाळी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या मंगला पाटील यांच्यासह पदाधिकारी जमले होते. या सर्व पदाधिकार्यांनी गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच कार्यालयात महामार्गापर्यंत घोषणाबाजी करीत येत चौकाजवळ त्यांनी मंत्री महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी महाजन यांच्याविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली.
विष पेरण्याच्या भूमिकेचा निषेध
आंदोलनापूर्वी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले की, राजकारण करतांन ते विकासाचे असले पाहीजे. मंत्री महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्या मुलाबाबत केलेले वक्तव्य योग्य नाही. विष पेरण्याच्या त्यांच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. जिल्ह्यात विकासाचे अनेक प्रश्न प्रलबित असतांना अश्याप्रकारे राजकारणाची प्रतिमा मलिन करणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.
यावेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी सांगीतले की, निखिल खडसे यांचा मृत्यू झाला, तेव्हा भाजपाच्या खासदार रक्षा खडसे तेथे होत्या मग महाजन यांचा त्यांच्यावर संशय आहे का? मंत्री महाजन यांनी खडसे यांच्याशी विकास कामे करण्याची स्पर्धा करावी. महाजन यांच्या देखील फर्दापूर गेस्ट हाऊसच्या भानगडी आम्हाला माहित आहेत. त्यात आम्हाला लक्ष द्यावे लागेल का ? असा इशाराही लाडवंजारी यांनी दिला.
यांचा होता सहभाग
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, रिकू चौधरी, अभिलाशा रोकडे, लिलाधर तायडे, अरविंद मानकरी, अमोल कोल्हे, मजहर पठाण, इब्राहिम तडवी, डॉ.रिजवान खाटीक, दत्तात्रय सोनवणे, प्रतिभा शिरसाठ, सलीम इनामदार हे सहभागी होते.