घराचे कुलुप तोडत घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

घराचे कुलुप तोडत घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

सातपूर | प्रतिनिधी | Satpur | Nashik

सातपूर परिसरात (satpur area) चोऱ्यांच्या घटना वेगाने वाढू लागले असून आता तर चोरट्यांची हिम्मत प्रचंड वाढली आहे आता तर रात्री नव्हे तर चक्क दिवसाही घरफोड्या (Burglary) होत असल्याने स्थानिक नागरीक धास्तावले आहेत.

शुकवारी अशोकनगरच्या विश्वासनगर व राधाकृष्णनगर येथील मध्यभागी असलेल्या सदगुरू रेसीडेन्सीमध्ये दुपारी चार वाजेला घरफोडीची (Burglary) घटना घडली. दोन विंग असलेल्या इमारतीत नेहमीच येणा-या जाणा-यांची वर्दळ असते अशा वेळी चोरट्यांनी योगेश पवार यांच्या घराचे कुलुप तोडत बेडरूम मध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे लाँकर तोडत रोख 75 हजार रुपये, सोन्याचा नेकलेस, कानातील डोंगल व दोन अंगठ्या लंपास केल्या.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी घटना स्थळाची पहाणी करत पंचनामा (panchana) केला. दाटलोकवस्तीचा भाग असतांनाही भरदिवसा घरफोडी (burglary) झाल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांनी केली. दरम्यान पवार यांच्या पत्नी कल्पना पवार मुलाला क्लाँसला घेण्यासाठी पाऊनेचार वाजेला गेल्या.

केवळ पंधरा मिनिटात त्या घरी आल्यावर कुलुप तोडल्याचे दिसले. यानंतर घरात पहाणी केली असता कपाटाचे लाँकर तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचा एैवज लंपास केला. पहिल्यांदाच इमारतीत चोरी (theft) झाली असल्याचे महिलांनी सांगितले. पवार यांच्या राहत्या घराच्या बाजूलाच किराणा दुकान आहे. संबधित घरफोडी करणा-यांनी रेकी करूनच चोरीकेली असावी असा अंदाच महिलांनी व्यक्त केला.

विशेष म्हणजे अगदी पाचशेमिटर अंतरावर बोलकर पोलिस चौकी असतांनाही दिवसा घरफोडी करण्याचे धाडसझाल्याने स्थानिक रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

कल्पना पवारांचे पानावले डोळे

मुळचे अमळनेर येथील असलेले पवार कुटूंबीय मेहनतीने स्वतःचे घर व किराणा दुकानाचा गाळा घेतला होता. परंतु रोख रक्कम व सोन्याचे दागीने चोरीला गेल्याने कल्पना पवारांचे डोळ पानावले. पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी पवार यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com