सिन्नर तालुक्यात पुन्हा घरफोडी

सिन्नर तालुक्यात पुन्हा घरफोडी

वावी | वार्ताहर Vavi

सिन्नर तालुक्यातील ( Sinnar Taluka )खंबाळे ( Khambale)गावा लगत आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तीन तोळे सोन्याचे दागिने व अंदाजे अकरा हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली.

खंबाळे गावालगत भागवत खंडू आंधळे हे घर बंद करून नेहमीप्रमाणे घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर शेतात कांदे काढण्यासाठी गेले होते दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत बंद दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला राहत असलेल्या खोलीत कपाट उघडून चोरट्यांनी तीन सोने तोळे व रोख अकरा हजार रुपये रक्कम चोरट्यांनी लांबवली.

या घटनेत एकूण तीन तोळे सोन्याचे दागिने त्यात सोन्याची चैन,अंगठी,नेकलेस,पुतळ्या.असा ऐवज चोरीला गेल्याचे आंधळे यांनी वावी पोलीस ठाण्यात ( Vavi Police Station)माहिती दिली सहा.पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तांदाळकर नितीन जगताप,सतीश बैरागी यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com