घरफोड्या करणारा ताब्यात; ११ गुन्हे उघडकीस

गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची कामगिरी
घरफोड्या करणारा ताब्यात; ११ गुन्हे उघडकीस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात घरफोडीचे प्रकार वाढले होते. यामुळे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश देऊन अशा गुन्हेगारांवर कडक कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एकच्या कारवाई एका अट्टल चोरट्याला ताब्यात घेऊन तब्बल 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

हसन हमजा कुट्टी (वय ४४) असे त्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. 6 जून रोजी गुन्हे शाखा युनिट एकच्या विशाल काठे यांना गुप्त माहिती मिळाली होती. की घरफोडी, चोरी करणारा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार कुट्टी हा नवनाथ नगर, पेठरोड पंचवटी येथे लपुन वास्तव्यास आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ मार्गदर्शनाखाली सपोनि तोडकर, अंमलदार रविंद्र बागुल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझिमखान पठाण, विशाल देवरे, विशाल काठे, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, राजेश राठोड यांच्या पथकाने सापळा रचून कुट्टीला जेरबंद केले.

पोलिसांना पाहून तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केल्यावर त्याने त्याच्या साथीदारासह नाशिक शहरात ६ व नाशिक ग्रामीण हददीत ५ दुकानातील शटर वाकवुन घरफोडीचे एकुण ११ गुन्हे केल्याची कबुली दिली. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीकडुन एकुण १,१६,०९० रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हसन हमजा कुटट्टी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन, त्याविरुध्द १४ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला यापुर्वी पंचवटी पोलीस ठाणे गुरनं २६७, २०१८ भादविक ४५४, ४५७, ३८० या घरफोडीच्या गुन्हयात दोषसिध्दी होवुन शिक्षा लागलेली आहे. तो दारूची दुकाने, किराणा मालाची दुकाने, कपडयाचे दुकाने यांची घरफोडी करून त्यातील रोख रक्कम चोरी करतो. तपासात सदर आरोपीने सोलापुर व मध्यप्रदेशातील शिंदवाडा येथेही ७ ते ८ गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com