Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याBullock Cart Race : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटणार?

Bullock Cart Race : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटणार?

मुंबई l Mumbai

राज्यात बैलगाडा आणि बैलांच्या शर्यतीला (bullock cart race) बंदी आहे. बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी बैलगाडा शर्यत प्रेमींकडून वारंवार होत आहे.

- Advertisement -

Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना ‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ का म्हणतात?

२०१७ साली मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. त्यानंतर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Photo : ‘ही’ आहेत देशातील TOP 10 सर्वात पॉवरफुल कपल

मागच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यामुळे बैलगाडी शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्रासह बैलगाडा शर्यत प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

राज्यात बैलगाडा शर्यत सुरु होणारच!

राज्यातील बैलगाडा शर्यतीस प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. बैलगाड्या शर्यती (Bullock cart race) हा राज्यातील शेतक-यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. राज्यात या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून बैलगाड्या शर्यत सुरु होणार, असल्याचा विश्वास पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या