Video : अग्नितांडवाचा दिवस! मनमाडजवळ गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक उलटला, सिलेंडरचे एकामागे एक स्फोट

मनमाड | प्रतिनिधी | Manmad

मनमाड जवळ पुणे-इंदूर महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक उलटून आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर सिलेंडरचे एका मागे एक स्फोट झाले. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली...

यामुळे महामार्गावरील वाहतूक 2 किमी लांब रोखून धरण्यात आली आहे. ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे 200 सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र सिलेंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास अडचण येत आहे. अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com