नाशिकवरुन जाणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी दिल्लीत बैठक

नाशिकवरुन जाणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी दिल्लीत बैठक

नाशिकवरुन (nashik)जाणाऱ्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या (Mumbai-Nagpur Bullet train) प्रकल्पावर लवकरच दिल्लीत मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत या प्रकल्पातील सर्व अडचणी सोडवून कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी ही माहिती दिली.

नाशिकवरुन जाणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी दिल्लीत बैठक
कसा असेल नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग? व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहणाच्या कामालाही सुरुवात झाली आहे. समृद्धी महामार्गालगतची (Samrusshi highway) जास्तीत जास्त जमीन या प्रकल्पासाठी वापरली जाणार असून याव्यतिरिक्त 38 टक्के जमिनीचं नव्याने अधिग्रहण करण्यात येणार आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पातील पुढील कामांकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.

नाशिकसह १० जिल्ह्यांतून बुलेट ट्रेन

नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार, देशात सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोरसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. यातीलच मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अरावती, वर्धा आणि नागपूर अशा दहा जिल्ह्यांतून हा प्रकल्प जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com