Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशदेशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला: दोन सत्रात अधिवेशन

देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला: दोन सत्रात अधिवेशन

संसदेचं अर्थसंकल्पीय सत्र (Parliament’s Budget session)31 जानेवारीपासून सुरु होणार आहे. दोन सत्रात हे अधिवेशन पार पडणार आहे. 31 जानेवारीपासून संसदेच्या (Parliament ) अधिवेशनाला सुरुवात होईल. 11 फेब्रुवारीला अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशन 12 मार्चला सुरु होणार आहे. तर, 8 एप्रिला अधिवेशनाची समाप्ती होईल. या दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman)या 1 फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहे.संसदेच्या इमारतीमध्ये कोरोना चाचणी आणि कोरोना लसीकरणाची यंत्रणा उभारण्यात आली आहे.

बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

- Advertisement -

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या एकूणच पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थसंकल्पाचे वेध आता लागले आहे. यंदाच्या वर्षी सामान्यांना बजेटमधून दिलासा मिळणार का, काय स्वस्त होणार, काय महागणार, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे.

आर्थिक वर्ष २०२२-२३ रोजीसाठी बजेट सादर केले जाणार असून, या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सीतारामन आणि पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योजकांशी बैठकांचा धडाका सुरु आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्थेने जोरदार कमबॅक केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या