किकवी धरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद

किकवी धरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रस्तावित किकवी धरणाच्या ( Kikvi Dam)उभारणीकामी निधी मिळवण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे.

नाशिककरांची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित असलेले किकवी धरण उभारण्यासाठी यापूर्वी वनविभागाकडून हस्तांतरित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी शासनाने 36 कोटी रुपयांच्या निधीला अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे.यामुळे लवकरच धरण उभारणीच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला अहवाल पाठवत येत्या 2023-24 च्या आर्थिक बजेटमध्ये किकवी धरणासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणीचे पत्र पाठविले होते. यामुळे 172 हेक्टर जमिनीचा मोबदला वनविभागाला दिला जाणार असून किकवी धरण उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकर्‍यांकडून हस्तांतरण करून घेतलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी 30 कोटी तर धरण उभारणीच्या कामासाठी लागणार्‍या 36 कोटी रुपयांच्या निधीलाही लवकरच मान्यता मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com