Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभविष्यातील भारताचा वेध घेणारा अर्थसंकल्प - विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

भविष्यातील भारताचा वेध घेणारा अर्थसंकल्प – विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

भारताला आत्मनिर्भरतेकडे आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प Budget केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन Union Finance Minister Nirmala Sitharaman यांनी सादर केला असून तो भविष्यातील भारताचा वेध घेणारा आहे. आर्थिक मापदंडांवर अधिक संतुलित, समावेशी आणि विकासाकडे leads to development नेणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Leader of Opposition Devendra Fadnavis यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

शेतकरी आणि कष्टकरी केंद्रीत या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांना समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. एक एक लाख मेट्रीक टन भातखरेदीसह २.३७ लाख कोटी रूपये हे एमएसपीवर खर्च होणार आहेत. शेती क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. शेती क्षेत्राशी संबंधित स्टार्टअपसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

‘हर घर नल से जल’ या योजनेसाठी ६० हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून सर्वसामान्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन होणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

राज्याना एक लाख कोटींचे व्याजमुक्त कर्ज ५० वर्षांसाठी देण्याचा निर्णय हा कोरोना काळानंतर विविध राज्यांच्या अर्थकारणाला गती देणारा निर्णय आहे. राज्य सरकारांच्या कर्मचार्‍यांना सुद्धा आता केंद्रीय कर्मचार्‍यांप्रमाणे इंसेन्टिव्ह प्राप्तीकरात मिळणार आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

सर्वस्पर्शी अर्थसंकल्प : प्रवीण दरेकर Comprehensive budget: Praveen Darekar

केंद्रीय अर्थसंकल्पात सर्व घटकांचा सर्वव्यापी विचार करत प्रत्येक घटकांना यामध्ये अंतर्भाव करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांच्या कार्यप्रणालीनुसार सर्वसामान्यांना दिलासा देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी असल्याचे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.

समाजातील सर्व घटकांसोबत शिक्षण क्षेत्राला महत्त्व देण्यात आले आहे. युवकांच्या हाताला काम मिळेल याचा सकरात्मक विचार करण्यात आला आहे. सूक्ष्म लघु उद्योगाच्या माध्यमातून २ लाख कोटी रुपये प्रस्तावित करत बेरोजगारांच्या हाताला काम देत उद्योग आणि स्वयंरोजगार क्षेत्रला बळकटी देण्याचा निर्धार करण्यात आल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.

पायाभूत मूलभूत सुविधांच्या विकासासाठी मोठी तरतूद करण्यात आल्यामुळे देशातील पायाभूत सुविधेला चालना मिळणार आहे. यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था बळकट होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

देशाला सज्ज करणारा अर्थसंकल्प : चंद्रकांत पाटील Budget to prepare the country: Chandrakant Patil

संसदेत आज सादर झालेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन देशाला आत्मनिर्भर आणि संपन्न बनविण्यासाठीचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. आगामी पंचवीस वर्षांतील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणाऱ्या या अर्थसंकल्पासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो आणि निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

करोनाच्या संकटातून बाहेर पडणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवून देशात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. गुंतवणूक, उत्पादन, शेती, शिक्षण, सामाजिक कल्याण, ग्रामविकास, शहरांचा विकास, वैद्यकीय सुविधा अशा सर्व क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देश आर्थिकदृष्ट्या प्रगत व्हावा आणि त्याचबरोबर स्वदेशी उद्योगांना चालना देऊन देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी महत्त्वाच्या तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या