Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याअरेच्चा! पूल वाहून गेल्याने शेतमाल वाहतुकीसाठी केला 'असा' जुगाड, 'पाहा' व्हिडीओ

अरेच्चा! पूल वाहून गेल्याने शेतमाल वाहतुकीसाठी केला ‘असा’ जुगाड, ‘पाहा’ व्हिडीओ

करंजी खुर्द | वार्ताहर | Karanji Khurd

यंदा पावसाने (Rain) घातलेला धिंगाणा घातल्याने अनेक ठिकाणी फरशी पूल वाहून गेले आहेत. अशा स्थितीतही मार्ग काढण्याची इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचा प्रत्यय तुम्हाला या व्हिडीओ पाहून येईल…

- Advertisement -

सिन्नर व निफाड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या सोमठाणे शिवारात देव नदीला आलेल्या पुरात पूल वाहून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात नेण्यासाठी रिकाम्या प्लास्टिकच्या ड्रमच्या पाळण्याचे जुगाड बनवत शेतमाल मार्केटला जाण्याच्या नित्यक्रमात खंड पडू दिलेला नाही.

सोमठाणे-ब्राम्हणवाडेच्या सीमेवर घुमरे टोकवस्ती आहे. या वस्तीवर बरेच शेतकरी कुटुंब वास्तव्यास आहेत. या शेतकऱ्यांना वस्तीवर जाण्यासाठी देव नदीवर पूल बनविण्यात आलेला होता. परंतु काही दिवसांपूर्वी देव नदीला पूर आला आणि हा पूल वाहून गेला.

झाडावर झुंज करणारे बिबटे आता पोहोचले छतावर

मागील महिन्यापासून वस्तीवरील शेतकऱ्यांचा टोमॅटो माल पिंपळगाव बसवंत बाजार समितीत विक्रीसाठी जात आहे. दररोज दोन ते तीन पीकअप जीपमध्ये जाळ्या भरून टोमॅटो मार्केटला नेला जात आहे.

माजी नगरसेवक बंटी तिदमे शिंदे गटात, मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

मात्र पूल वाहून गेल्याने या शेतकऱ्यांना शेतमाल नेण्यासाठी रस्ताच नाही. महेश घुमरे, सागर डिक्के, सचिन आव्हाड, विठ्ठल घुमरे व आदी शेतकऱ्यांनी प्लास्टिकच्या पाण्याचे दोनशे लिटरचे दोन ड्रम घेतले. त्यावर फेब्रिकेशन करून डिझाइन केले. दोन दोरखंडाला हा पाळणा बांधून त्यावर टोमॅटोच्या ८ जाळ्या वाहण्याचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे.

पोल्ट्री फार्ममध्ये शिरले पुराचे पाणी, १२ हजार कोंबड्या दगावल्या

ब्राम्हणवाडे शिवारातील घुमरे टोक वस्तीवरील ६ मुले शाळेत जातात. मात्र नदीला पूर असल्याने व पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गुडघाभर पाण्यातून पालक विद्यार्थ्यांची ने-आण करतात तर शाळेला दांडी मारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

पालकांनो सावधान! आठ महिन्यांच्या चिमुरड्याने गिळले नेलकटर

देवनदीवर सिमेंटचे पाईप टाकून आम्ही स्वखर्चातून पूल उभारला होता. मात्र तोही वाहून गेल्याने आम्हाला जीव धोक्यात घालून व वेळप्रसंगी पोहत जावून शेतमाल बाजारात न्यावा लागत आहे. याठिकाणी कायमस्वरुपी पूल होणे गरजेचे आहे.

– महेश घुमरे, शेतकरी ब्राम्हणवाडे, ता. निफाड.

- Advertisment -

ताज्या बातम्या