मच्छू नदीवरील पूल कोसळला; मोठ्या जीवित हानीची शक्यता

मच्छू नदीवरील पूल कोसळला; मोठ्या जीवित हानीची शक्यता
USER

अहमदाबाद

गुजरातच्या ( Gujrat ) मोरबी( Morbee ) यथे मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. मोरबीतील मच्छू नदीवर ( Macchu River )असणारा पूल अचानक ( Bridge Collapsed )कोसळला आहे. त्यामुळे मोठी हानी झाली आहे.

या दुर्घटनेत अनेक जणांचा जीव धोक्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पूल कोसळल्यानंतर नेमके किती जण नदीत वाहून गेले याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या घटनेमुळे मोठी जीवीतहानी झाल्याची भीती वर्तवली जात आहे.

दरम्यान छटपुजे निमित्त मोठ्या संख्येने भाविक या पुलावर उपस्थित होते. या उत्साहा दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे आनंदावर विरजण पडलं आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस, बचाव पथक, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com