पुणेगाव धरण परिसरातील पूल पाण्याखाली; गावांचा संपर्क तुटला

पुणेगाव धरण परिसरातील पूल पाण्याखाली; गावांचा संपर्क तुटला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात (Nashik District) जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यात असलेल्या धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे अनेक धरणातून विसर्गाला सुरुवात झाली आहे...

दिंडोरी तालुक्यातदेखील जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे वणी (Vani) येथील पुणेगाव धरण (Punegaon) परिसरातील पूल पाण्याखाली गेला आहे.

वाढत्या पावसामुळे अंबानेर आणि जिरवाडे या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे दोन गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा (Rain) जोर वाढत असल्याने स्थानिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com