कोरोनाच्या सुपर स्प्रेडर विवाहातील नवरीही पॉझिटिव्ह, अनेक मोठ्या नेत्यांना लागण

कोरोनाच्या सुपर स्प्रेडर विवाहातील नवरीही पॉझिटिव्ह, अनेक मोठ्या नेत्यांना लागण

भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची मुलगी आणि ठाकरे घराण्याची नववधू अंकिता पाटील (Ankita Patil) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवरून दिली आहे. अंकिता पाटील आणि निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांचे लग्न मंगळवारी पार पडले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनेक नेत्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.

कोरोनाच्या सुपर स्प्रेडर विवाहातील नवरीही पॉझिटिव्ह, अनेक मोठ्या नेत्यांना लागण
Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांची कन्या अंकिता बावडा लाखेवाडी (ता. इंदापूर) गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. तिचा विवाह मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये ठाकरे घरण्यातील बिंदूमाधव ठाकरे (Nihar Thackrey) यांच्याशी २८ डिसेंबर रोजी विवाह झाला. या विवाहसोहळ्यात अनेकांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली. या विवाहसोहळ्यात अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. आता या लग्नातील नवरीच कोरोना पॉझिटीव्ह आली आहे.

कोरोनाच्या सुपर स्प्रेडर विवाहातील नवरीही पॉझिटिव्ह, अनेक मोठ्या नेत्यांना लागण
मुलांचे लसीकरण : नोंदणी कशी करावी? कागदपत्रे काय लागतील?

विवाह सोहळ्यातील हे पॉझिटीव्ह

विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे पतीही पॉझिटीव्ह आले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे.

अंकिता पाटील यांनी ट्विटरवर आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com