लाचखोर कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

देवगाव । वार्ताहर Devgaon

येथील मंडल अधिकारी कार्यालय परिसरात लाच घेतांना कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक (ACB )विभागाने रंगेहाथ पकडले. नैताळे येथे ग्रामसेवक आणि इतर खासगी व्यक्तींना लाच घेताना पकडून पाच दिवस उलटत नाही, तोच दुसरी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराच्या निफाड तालुक्यातील दहेगाव येथील वडिलोपार्जित शेतजमिनीचे खाते वाटप आदेश निफाड तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाले होते. त्या आदेशाची नोंद सातबारा उतार्‍यावर घेऊन नोंद मंजूर करण्यासाठी कोतवाल लक्ष्मण फकिरा वैराळ यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा झाली असता बुधवारी (दि.25) सापळा रचण्यात आला. तडजोडीअंती तीन हजार रुपये स्विकारताना वैराळ यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, शरद हेंबाडे, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com