लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

ओझे l वार्ताहर Oze

दिंडोरी तालुक्यातील( Dindori Taluka ) रामशेज आशेवाडी (Ramshej Aashewadi )येथील ग्रामसेवकाला (Gramsevak )पिंपळनारे येथे मृत्यूच्या दाखल्यासाठी सहाशे रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले असून सदर ग्रामसेवक रात्री उशिरापर्यत दिंडोरी पोलिस ठाण्यात ( Dindori Police Station)गुन्हा नोंदविण्याचे काम चालू होते.

आशेवाडी येथील एका नागरिकाच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले होते त्या व्यक्तीचा मृत्यू प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी तक्रारदाराकडे ग्रामसेवक श्रावण वामन वाकचौरे( वय 52) रा नाशिक यांनी सहाशे रुपये लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर आज नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडून मृत्यू प्रमाणपत्रासाठी सहाशे रुपये घेताना अतिरिक्त ग्रामपंचायतचा कार्यभार असणाऱ्या ग्रामपंचायत पिंपळनारे येथे रंगेहात पकडले आहे.

नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक मीरा आदमाने यांच्या नेतृत्वाखालील प्रवीण महाजन अजय गरुड परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली याबाबत त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. या घटनेने दिंडोरी पंचायत समिती मध्ये खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com