आदिवासी विभागाच्या लाचखोर लेखाधिकार्‍यास रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; गुन्हा दाखल
आदिवासी विभागाच्या लाचखोर लेखाधिकार्‍यास रंगेहाथ पकडले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आदिवासी मुलांच्या वस्तीगृहाच्या (Tribal children's hostel) भोजनाच्या ठेक्यातील (food contract) 73 लाख रुपयांच्या मोबदल्यात अर्धा टक्केे प्रमाणे लाच (bribes) मागणार्‍या यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास (Integrated Tribal Development Project Office) प्रकल्प कार्यालयातील लेखा अधिकारी (Accounts Officer) रविंद्र भाऊराव जोशी (वय-57) यांना 20 हजारांची लाच घेतांना (accepting bribes) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-corruption department team) पथकाने रंगेहाथ (Caught red-handed) पकडले. त्यांच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील मे.सप्तश्रृंगी माता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या नावाने आदिवासी मुलांचे वस्तीगृह (नविन) चोपडा ता.चोपडा या वस्तीगृहास सन-2021-2022 या शैक्षणिक वर्षात वस्तीगृहात लागणारे दैनंदीन भोजनाचा ठेका घेतलेला होता. त्यांनी वर्षभरापासून वस्तीगृहास पुरविलेल्या भोजन ठेक्याचा मोबदला म्हणून पत्नीच्या नावे असलेल्या संस्थेच्या बँक खात्यामध्ये 73 लाख रुपयांची रक्कम डी.डी.द्वारे अदा केली होती.

या वर्षभराच्या सर्व भोजनाच्या ठेक्याच्या मोबदल्यात यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील लेखा अधिकारी रविंद्र जोशी यांनी 73 लाखांच्या अर्धा टक्क्याप्रमाणे 36 हजार 500 रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार तक्रारदाराने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कर्मचार्‍यांनी यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सापळा रचला. लेखाधिकारी रविंद्र जोशी यांनी तडजोड अंती 20 हजारांची लाच स्विकारताच त्याला रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे,पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com