Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यालाचखोर पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

घोटी | जाकीर शेख Ghoti

घोटी पोलीस ठाण्यातील ( Ghoti Police Station)पोलीसाला दहा हजाराची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याने घोटी शहरात एकच खळबळ ऊडाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, घोटी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रविराज प्रकाश जगताप, वय-३७, बक्कल नंबर-२१४६ याने तक्रारदार यांच्या व त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध घोटी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात मदत केल्याच्या व यापूर्वी वेळोवेळी मदत केल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून सापळा रचुन पंचासमक्ष दहा हजार रुपयाची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले असुन याबाबत पोलीस रविराज जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

हा सापळा लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक .शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांनी सापळा रचुन पोलीस रविराज जगताप यांना पंचासमक्ष लाच स्विकारतांना अटक केली. या कारवाईत पो. ना. अजय गरुड , पो. ना. किरण अहिरराव, पो. ना. प्रकाश महाजन, पो. ह. संतोष गांगुर्डे या पोलीस पथकाने कामगिरी केली.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो. टोल फ्री क्रं. 1064 नाशिक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या