Breaking # शिंदे गटाकडून जळगावच्या महापौरांना धमकी : राजकारण तापले

जयश्री महाजन
जयश्री महाजनJayashri Mahajan

जळगाव । jalgaon

शिवसेना कोणाची (Whose Shiv Sena?) यावरून राज्यात दोन्ही गटात युध्द रंगलेले (Both groups are war-torn) असतानाच जिल्ह्यात देखील दोन्ही गट आमने-सामने येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.माजी मंत्री आ.गुलाबराव पाटील (MLA Gulabrao Patil) यांनी जळगावच्या महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांना शिंदे गटात सामील व्हा (Join the Shinde group) अन्यथा निधी मिळणार (not getting funds otherwise) नाही अशी धमकी (Threat) गुरूवारी दिल्याचे सांगत ठाकरे गटाच्या सदस्यांनी यावर पलटवार करीत असल्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे स्पष्ट केले असले तरी शनिवारी या विषयावरून जिल्हयात राजकारण चांगलेच तापले होते.

जळगाव जिल्ह्यात उध्दव ठाकरे यांच्या समर्थकांना एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले.

या आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेचे तसेच युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. जळगाव महापालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांना एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्यासाठी धमकी देण्यात आल्याचे समजते.

शिंदे गटात सहभागी झालात, तर शहराच्या विकासकामांसाठी निधी देवू, अन्यथा विकासकामांमध्ये अडचणी निर्माण केल्या जातील असे सांगण्यात येत आहे.यामागे गुलाबराव पाटील यांचाच हात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.

सत्तांतरानंतर शिंदे गट जळगाव जिल्ह्यात वर्चस्व सिध्द करण्यासाठी मैदानात उतरला आहे. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ संघटना बळकट करण्यासाठी शिवसेनेही कंबर कसल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट व उध्दव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात प्रतिष्ठेची लढाई पहायला मिळणार आहे.

जनता त्यांची जागा दाखवेल- संजय सावंत शिंदे सोबतच्या आमदारांकडून घाणेरडे राजकारण केले जात आहे.कुठल्याही शिवसैनिकाला धमकी देवू नये, जो धमकी देईन, त्याला जनता त्यांची जागा दाखवेल,जळगावच्या महापौरांना देखील धमकी दिली आहे मात्र धमकी देणार्‍यांना मातीत लोळविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी शिंदे गटाच्या आमदारांना इशारा दिला आहे.

संपर्क प्रमुख संजय सावंत

धमक्यांना भीक घालत नाही- जयश्री महाजन शिंदे गटात सहभागी झालात, तर शहराच्या विकासकामांसाठी निधी देवू, अन्यथा विकासकामांमध्ये अडचणी निर्माण केल्या जातील,अशी धमकी देण्यात आली.या धमक्यांना मी भीक घालत नाही, मी निष्ठावंत शिवसैनिक आहे, जनतेचा शिवसैनिक म्हणून माझ्यावर जो विश्वास आहे, त्याला मी तडा जावू देणार नाही, अशी भूमिका महापौर जयश्री महाजन यांनी घेतली आहे

महापौर जयश्री महाजन

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com