Breaking # पीएफआय संघटनेतील तरुणाला एटीएसकडून मध्यरात्री अटक

संघटनेत शारिरीक शिक्षक असल्याची माहिती
Breaking # पीएफआय संघटनेतील तरुणाला एटीएसकडून मध्यरात्री अटक

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून पीएफआय संस्थेशी (PFI organization) संबंधित असलेल्यांवर एटीएसकडून (ATS) देशभरात कारवाई (Action across the country) केली जात आहे. यापुर्वी जळगावातून जालना (Jalna) येथील तरुणाला (young man) मेहरुण परिसरातील दत्त नगरातून परिसरातून एटीएसने ताब्यात (taken into custody) घेतले होते. एटीएसने (ATS) उनैस उमर खय्याम पटेल (Unais Umar Khayyam Patel) (वय-31, रा. आक्सानगर) याला मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्याच्या घरुन अटक (arrested) केली आहे. आतापर्यंत जळगावातून दोन जणांना अटक (Two people were arrested) केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेशी संबंधित असलेल्यांवर दहशतवादी विरोधी पथक अर्थात एटीएसकडून देशभरात कारवाईची मोहीम राबविली जात आहे. देशभरातून अनेक जणांना एटीएसने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी एटीएसने एका धार्मिक स्थळावर छापा टाकून याठिकाणी झोपलेल्या अब्दुल हद्दी रौफ मोमिन वय 32,रा.रमहेमान गंज, वरुन अपार्टमेंट, जालना) याता ताब्यात घेतले होते. त्याची अधिक चौकशी केली असता, तो महाराष्ट्रातील पीएफआयचा खजिनदार असल्याची माहिती समोर आली होती

त्या कारवाईनंतर एटीएसकडून या संस्थेशी संबधित असलेल्या उनैस उमर खय्याम पटेल याच्यावर नजर ठेवून होते. वरिष्ठ स्तरावरुन कारवाई करण्याचे आदेश मिळताच मंगळवारी पहाटेच्या साडेतीन वाजेच्या सुमारास जळगाव दहशतवाद विरोधी शाखेचे प्रमुख चंद्रकांत पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या संयुक्त पथकाने अक्सा नगरातून संशयिताच्या मुसक्या आवळीत त्याला अटक केली.

अनेक दिवसांपासून होता संघटनेत सक्रीय

एटीएसने ताब्यात घेतलेल्या उनैस उमर खय्याम पटेल हा पीएफआय संघटनेत शारीरीक शिक्षक असल्याची माहिती मिळाली आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेचे काम करीत असून तो सक्रीय दखील होता. पटेल याला सीआरपीसी 151 (3) प्रमाणे स्थानबध्द करण्यात आले असून अटक करण्यात आली आहे.अन् विद्यार्थ्यालाही घेतले होते ताब्यात

एटीएसच्या पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास अनिस राहत असलेल्या अक्सा नगरातील घरावर धाड टाकली. यावेळी त्याच्यासोबत शहादा येथील एक तरुण होता. त्याला देखील पथकाने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता तो अनिस पटेलचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली. चौकशी केल्यानंतर त्या तरुणाला सोडून देण्यात आले. एटीएसने केलेल्या या कारवाईमुळे पुन्हा खळबळ माजली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com