Breaking News # photos: पहूर येथे शालेय बसला अपघात, जीवीत हानी नाही

Breaking News # photos: पहूर येथे शालेय बसला अपघात, जीवीत हानी नाही

रवींद्र लाठे

पहूर Pahoor ता. जामनेर

शेंदुर्णी येथील सरस्वती विद़या मंदिराच्या स्कुल बसला -School bus आज सकाळी सात वाजेच्या आसपास अपघात accident झाला आहे.  अपघातात जीवीत हानी no loss of life टळली असली तरी बरेच विद्यार्थी जखमी झाले आहेत.

आज सकाळी शालेय बसने  मुलांना घेवून बस शाळेकडे निघाली, पहूर ते शेदूर्णी रस्‍त्‍यानेजात असतांना मंदिराजवळ बसचे पाटे तुटल्याने बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या खाली उतरली, ती एका झाडावर आदळून पलटली. बसच्या धडकेने झाडाची मोठी फांदी तुटून बसवर पडली. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान जखमी विद्यार्थ्यांना पहूर व शेंदुर्णी कडील ग्रामस्थांची घटनास्थळी धाव घेत उपचारासाठी पहूरच्या ग्रामीण रुग्णालय व जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

अपघातची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयाच्या रूग्ण्वाहिकांनी जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी दाखल केले. याघटनेमुळे रूग्णालयात पालकांची मोठी गर्दी झाली आहे. सविस्तर बातमी थोडया वेळात वाचा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com