Wednesday, April 24, 2024
HomeजळगावBreaking News : जिल्हा दुध संघाचे एमडी  मनोज लिमयेसह चौघांना अटक

Breaking News : जिल्हा दुध संघाचे एमडी  मनोज लिमयेसह चौघांना अटक

जळगाव : jalgaon

  जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या (District Cooperative Milk Producers Union) विक्री विभागाने (sales department) ए ग्रेड दर्जाचे (a grade quality ghee) ५२५ रुपये किलोचे तुप चक्क ८५ रुपये किलो प्रमाणे विक्री केले. ७ लाख ९२ हजार -loss of Rs= रुपयांचे नुकसान केले. या गुन्ह्यात पुरवणी जबाबावरुन (supplemental answer) कार्यकारी संचालक मनोज लिमये, (Executive Director Manoj Limaye) अनिल अग्रवाल, हरी पाटील व अशोक पाटील (Anil Agarwal, Hari Patil and Ashok Patil) या चौघांना शहर पोलीसांनी (City police) रात्री उशिरा (Arrested late) अटक केली आहे. या गुन्ह्याच्या तपासात चौघांना अटक झाली असून संचालक मंडळही (Board of Directors ) अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

तक्रार दुध संघाचे प्रभारी कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे व कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली होती. परंतु या गुन्ह्यात तक्रारदार मनोज लिमये हेच संशयित आरोपी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दुधसंघातील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच समितीची नियुक्ती केली आहे. या समितीकडून चौकशी सुरू असतांचा आता तुप विक्रीबाबत अपहार झाल्याची बाब समोर आली आहे. ए ग्रेडचे तुप  बी ग्रेडच्या नावाने विक्री करून दुधसंघाला तब्बल ७लाख ९२ हजार रूपयांचा चुना लावण्यात आला आहे.

Visual Story : ६ वर्ष डेट केलेल्या दीपिका-रणवीरची Untold ‘लव्ह स्टोरी’

संघाकडे बी ग्रेड तुपाचा साठा शिल्लक नसल्याचे सांगत असतांना दुसरीकडे ए ग्रेडचे तुप बी ग्रेडच्या नावाने विक्री करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलीसांनी चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा असे पत्र संघाचे कार्यकारी संचालक  मनोज लिमये, प्रभारी कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या नावे दिले आहे.

मागील प्रशासकीय समिती सभा क्र. २ दि. १३ ऑगस्ट रोजी बी ग्रेड तुप विक्री करु नये असे निर्देश दिलेले असतांना तुप विक्री झाल्याने त्यामागे दुध संघास नुकसान पोहचविण्याचा हेतू होता की का?तसेच विक्री विभाग प्रमुख अंबीकर यांनी २३ ऑगस्ट रोजी बी ग्रेड तुपाचा साठा नसतांना सुध्दा प्रशासकीय समितीला ९१५ किलो बी ग्रेड तुप विक्री करण्यासाठी टिपणी दिली. तथापी प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी वेळोवेळी बी ग्रेड तुपाच्या नमुण्याची मागणी केली असता ते उपलब्ध करुन दिलेेले नाहीत.असे ही तक्रारीत नमूद केले आहे.

Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!

दरम्यान दुसरा गुन्हा देखील शहर पोलीस ठाण्यात दाखल असून आ.मंगेश चव्हाण व कार्यकारी संचालक मनोज लिमये या दोघांच्या तक्रारींची देखील चौकशी सुरु आहे. रात्री उशिरा मनोज लिमये यांना अटक झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून खडसे गटाला हा एक हादराच मानला जात आहे. जिल्हा दुध संघाची निवडणुक प्रक्रिया सुरु असून या निवडणुकीच्या वेळीच दुध संघातील कार्यकारी संचालकाला अटक झाल्याने अनेक मातब्बर यामुळे अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तक्रारींचा तपास संशयित संचालकांवर देखील सुरु असल्याचे समजते.

उमर्टीहून पिस्तूल नेणारी टोळी जेरबंद

कारवाई राजकीय दबावातून- आमदार खडसे 

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी मनोज लिमये यांच्यावर राजकीय दबावातून कारवाई करण्यात आली आहे. दूध संघात सुडाचे राजकारण केले जात असून या संदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. पोलिसांच्या भूमिकेवर देखील आता संशय येत आहे.  

जिल्हा बँकेतील कारभाराचीही चौकशी होणार 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्यात आलेल्या साखर कारखान्याच्या विक्री बाबतही प्रश्न उपस्थित केले जात असून बँकेतील कारभाराची चौकशी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या